शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

इदगाहवरून देशप्रेमाचा संदेश

By admin | Updated: June 27, 2017 00:57 IST

नाशिक : आपल्या देशावरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावरून देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या देशावरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावरून देण्यात आला. हजारो समाजबांधव यावेळी रमजान ईदच्या नमाजपठणासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने उपस्थितांनी सामूहिक विशेष नमाज अदा केली.  रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील इदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी नमाजपठण केले. सकाळी ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये काही वेळ चिंतेचे वातावरण होते; मात्र क्षणार्धातच ढगाळ हवामान दूर होऊन सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्याबाबत असलेली चिंता दूर झाली. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिक मैदानाच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली होती. ... जब दिल से दिल मिलता हैं‘जब ईद आती हैं, तो हर दिल से दिल मिलता हैं...,’ याची प्रचिती इदगाह मैदानावर उपस्थितांनी अनुभवली. उपस्थित हजारो मुस्लीम बांधव एकमेकांशी हस्तांदोलन करत आलिंगन देऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत होते. आपापसातील बंधूभाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा, सामाजिक सलोखा राखला जावा, हाच उद्देश यावेळी दिसून आला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात ईदच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. ईदगाह मैदान येथे विविध मान्यवर आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत आलिंगन दिले.मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षावईदनिमित्त इदगाह मैदानावर महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, दिनकर पाटील, हेमलता पाटील, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, विनायक खैरे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजय मगर, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अजय देवरे आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खतीब यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.