शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:56 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्ती दान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. सिडको प्रभागातून १३ हजार १४४ मूर्तींचे संकलन करण्यात आले असून, सुमारे सात टन निर्माल्य जमा झाले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.  प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यात गोविंदनगर येथील जिजाऊ वाचनालय (८१३), इंदिरानगर येथील डे के अर शाळा (६२०), अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुल (६३०२), पिंपळगाव खांब वालदेवी नदी (१२००), पवननगर जलकुंभ कमाटवाडे येथील मॉसाहेब मीनाताई ठाकरे शाळा (८८८) आदींसह सहा ठिकाणी मनपाच्या वतीने मूर्ती संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक अलका अहिरे, छाया देवांग, किरण गामणे, बाळासाहेब पाटील, डॉ. दिलीप श्ािंदे, यशवंत नेरकर, उखा चौधरी आदींनी मूर्ती संकलनासाठी आवाहन केले. सिडको प्रभागात एकूण १३ हजार १४४ मूर्ती संकलन व सात टन निर्माल्य जमा करण्यात आले. यासाठी सहा वाहने, १२ ट्रॅक्टर, तीन डंपरची व्यवस्था करण्यात आली होती.‘नाशिकची आई गोदामाई’तर्फे जनजागृतीनाशिकची आई गोदामाई या संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी जनजागृती करण्यात आली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. यात सुमारे पाच हजार मूर्तींचे संकलन करून ते मनपाकडे सुपूर्द करण्यात आले. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन, दर्शन शिरोडे व पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम