शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या उपस्थितीत गणरायाला निरोप

By admin | Updated: September 16, 2016 22:19 IST

दिंडोरी, ओझर, त्र्यंबकेश्वर, निफाड : मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक : भक्तांच्या उत्साही वातावरणात, तुरळक पावसाच्या सरींचा आनंद घेत जिल्हाभरात विविध ठिकाणच्या नदीपात्रात व लहान-मोठ्या तलावात मूर्ती विसर्जित करून गणरायाला निरोप देण्यात आला. ओझर : येथे सकाळपासून पावसाचे वातावरण असल्याने कार्यकर्त्यांचा थोडा हिरमोड झाला होता. परंतु रिमझिम पावसातही उत्साही वातावरणात गणेश विसर्जनासाठी नाचत गाजत मिरवणूक निघाल्या. घरगुती गणरायाला येथील असलेल्या बाणगंगा नदी असलेल्या वेशीजवळील नदीकाठी, मठाजवळील बंधाऱ्यावर विसर्जन करण्यात आले, तर मोठ्या गणेश मंडळांनी पिंपळगावजवळील कादवा नदीत विसर्जन केले. यंदा मूर्तिदान संकल्पना किंवा कृत्रिम तलाव नसल्यामुळे निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. लहान मुले ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषणा देत होते. तसेच येथील विविध मित्रमंडळांनी दुपारनंतर मिरवणुकीला सुरुवात केली.सर्वप्रथम सुतार गल्लीजवळील इच्छापूर्ती गणेश मंडळाने सुरुवात केली. त्यानंतर कासार लेन मित्रमंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर मेनरोड येथील ओझरचा राजा मित्रमंडळाने एका पोशाखात मिरवणूक काढली. नंतर शिवाजी चौक रुपेश्वर मित्रमंडळ, वीर तानाजी चौक मानाचा राजा मित्रमंडळ, राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, हिंदुहृदयसम्राट सर्कलचा इच्छामणी गणेश, महाराणा फ्रेंड सर्कल, शिंदे मळा मित्रमंडळ, संभाजी चौक मित्रमंडळ, यंगस्टार मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, कन्सारा मित्रमंडळ, मोरया फ्रेड सर्कल आदि मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. यावेळी २१ फुटी मानाचा राजावर होणारी पुष्पवृष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. परिसरात सर्वत्र रिमझिम पाऊस असूनही उत्साह ओसंडून वाहत होता. पावसात भिजत डीजेच्या तालावर नाचत तरु णाईने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालून भावपूर्ण निरोप दिला. यावेळेस शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात शाही मिरवणुकांनी बाप्पाला निरोपपेठ : सजवलेल्या घोड्यावर हातात समशेर घेऊन रुबाबात आरूढ झालेले जय मल्हार, सोबतीला विविध वेशभूषेत जेजुरीकरांचा गराडा, घोडे, उंट यांची सलामी आणि ढोल-ताशांच्या आवाजावर थिरकणारे पेठवासीय अशा शाही मिरवणुकीने पेठ शहरातील गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.येथील शिवमुद्रा फ्रेंड्स सर्कलची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकांत जाधवर यांनी साकारलेली जय मल्हारची भूमिका मिरवणुकीचे आकर्षण ठरली. हत्ती, घोडे, उंट यांचा मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता. शिवरायापासून ते मावळ्यांपर्यंत वेशभूषा केलेली चिमुकली मंडळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जि. प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी शिस्तीचे दर्शन दाखवले. पेठ शहरातून भव्य मिरवणुकीनंतर संगमेश्वर बंधाऱ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांसमवेत घरगुती गणेशाचेही गणेशभक्तांनी उत्साहात विसर्जन केले. पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. इगतपुरीत गणरायाला निरोपइगतपुरी : समस्त भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाला इगतपुरी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात व मंगलमय वातावरणात वरुणराजाच्या साक्षीने निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात गर्दी उसळली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, मोरया रे बाप्पा मोरया रे’, ‘अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर’ या घोषणांनी परिसर निनादून गेला होता. इगतपुरी शहरासह तालुक्यातील बोरटेंभे, टाकेद, कावनई, वाडीवऱ्हे, मुकणे, सांजेगाव, पाडळी देशमुख, गोदें, भावली, नांदगाव सदो, मोगरे, मालुंजे, खेड, मुंढेगाव, देवळे, आहुर्ली, साकर, खेड, माणिकखांब, बेलगाव तऱ्हाळे, कवडदरा, वैतरणा, साकूर, अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव, उभाडे, उंबरकोन, धामणगाव आदि भागात जल्लोषमय वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.