ओझर : येथील हिंदुहृदय सम्राट सर्कलच्या इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळाच्या वतीने रविवारी रात्री खरवाड ता. पेठ येथील जय जनार्दन भारु ड मंडळाचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. येथील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. संबंधित कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन तर केलेच पण अध्यात्म व स्वच्छतेविषयी जनजागरण केले. या भारुड मंडळात दुर्गादास वाघमारे, चंद्रकांत पाडवी, पुष्पराज आवारे, तुळशीराम भोये, चेतन ठाकरे, हेमराज ठाकरे, पुंडलिक गवळी आदि कलाकारांचा सहभाग होता.कार्यक्र माच्या सुरु वातीला प्रतीक पडोळ या लहान मुलाने स्वच्छतेविषयी केलेल्या शैलीदार भाषणातून लोकांची मने जिंकून घेतली.यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी सुनील कदम, प्रकाश महाले, यतिन कदम, भैयासाहेब भडके, प्रकाश कडाळे, रामदास मोरे, दीपक जाधव, संजय पगार, विजय भाऊ भडके, राजू भडके उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू साळवे, मनोज पाटील, डिगंबर जाधव, नितीन जाधव, देवेंद्र तिवारी, राजेंद्र जुमडे, धनेश कदम, संदीप गांगुर्डे, मयूर क्षीरसागर, करण आंबेकर, अनिल गाडेकर, शरद मोंढे, अनिल सोमासे, साहेबराव गांगुर्डे, संदीप सोमासे, विनोद अहिरे, सोमनाथ सोनवणे, विशाल जाधव आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
भारुडातून युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश
By admin | Updated: September 13, 2016 00:45 IST