सलग दोन वर्षे हा यात्रोत्सव आणि आठ दिवस चालणारा बोहाडा उत्सव रद्द झाल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे; मात्र सध्याचा कोरोना संसर्ग हा वाढत असल्याने यात्रा समितीने घेतलेल्या निर्णयाचा ग्रामस्थांनी स्वीकार केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला बोहाडा उत्सव हा मेशीसह परिसरातील एक विलक्षण अनुभूती आणि भक्तीमय आनंद देणारा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. गावाने वीस वर्षांपूर्वी जगदंबा माता मंदिराची लोक वर्गणीतून उभारणी केली आहे. बरेच ठिकाणी काळाच्या ओघात बंद झालेला बोहाडा उत्सवाची परंपरा मात्र मेशी गावाने अजूनही जोपासली आहे. या कालावधीत आठ दिवस रामायणावर आधारित विविध देवदेवतांची मुखवटे धारण करून गावातील कलाकार संबळ वाद्याच्या विशिष्ट चालीवर नाचवितात. मंदिरापासून ते बोहाडा चौकापर्यंत सोंगे(मुखवटे) धारण केलेले कलाकार आपली पौराणिक कला प्रदर्शित करतात. याशिवाय आठ दिवस लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात येते. बोहाडा उत्सवाची सांगता ही अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीच्या वाजतगाजत मिरवणुकीने होते. याच दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गावाच्या यात्रोत्सव आणि बोहाडा उत्सवासाठी बाहेरगावी नोकरी,व्यवसाय यानिमित्ताने गेलेले भाविक आवर्जून हजेरी लावतात तसेच सासूरवाशीणीही यासाठी माहेरी येतात. यंदा मात्र कोरोनामुळे भाविकांना या उत्सवाला मुकावे लागणार आहे.
इन्फो
मंदिरावर विद्युत रोषणाई
मेशी हे गांव तालुक्यातील एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासणारे गाव म्हणून प्रसिध्द आहे. मात्र मागील वर्षीपासुन कोरोना या महामरीने सगळीकडे अक्षरशः थैमान घातले असुन यामुळे पारंपारिक सण उत्सव साजरे करण्याची यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही गावातील भाविकांनी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने मंदिर आणि परिसराची स्वच्छता करून रोषणाई केली आहे. मात्र गावातील नागरिकांनी मंदिरात गर्दी करू नये असे आवाहन यात्रा समितीने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
फोटो - ०७ मेशी टेम्पल
मेशी येथील जगदंबा माता मंदिर
===Photopath===
070521\07nsk_11_07052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ मेशी टेम्पल मेशी येथील जगदंबा माता मंदिर