शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:14 IST

सध्याचे युग हे स्पर्धेचे असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़८) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात सीमा हिरे बोलत होत्या़

नाशिक : सध्याचे युग हे स्पर्धेचे असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़८) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात सीमा हिरे बोलत होत्या़  दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या मराठा समाजातील ३६६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन कुटुंबाबरोबरच समाजाचेही नाव उज्ज्वल करावे, असे नाना महाले यांनी सांगितले़ तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ तर प्रकाश चव्हाण यांनी समाजाकडून विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळ दिले जाईल, अशी घोषणा केली़  व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, डॉ़ सुनील ढिकले, संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण वाघ, सचिव अरुण पळसकर, सहसचिव अरुण मोरे, कार्याध्यक्ष मधुकर जाधव, गणेश मोरे, सुधाकर चव्हाण, शंकर टाकेकर, डॉ़ राजेंद्र देशमुख उपस्थित होते़  कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पुंडलिक घुले, सर्जेराव वाघ, शैलेश भुजंगे, शिवराज संधान आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ (भाऊ) हिवाळे यांनी तर आभार अविनाश वाळुंजे यांनी मानले़ यावेळी मुलांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़