शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र अमान्य

By admin | Updated: June 24, 2017 00:23 IST

नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसून शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले ओळखपत्रेच ग्राह्य धरले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसून शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले सतरा ओळखपत्रेच ग्राह्य धरले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ११ मतदान केंद्रांवर एकूण ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी सांगितले.व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांनी गुरुवारी उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी काही उमेदवारांनी मतदानासाठी व्यापारी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरू नये अशी मागणी केली. तर काही उमेदवारांनी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरावे अशी मागणी केली. याबाबत करे यांनी मतदानासाठी बॅँकेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसल्याचे स्पष्ट करत केंद्र व राज्य शासनाचे निवडणूक आयोगाने ठरविलेले १७ ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट केले.मतदान प्रक्रियेचे नियोजनसत्तारुढ सहकार व प्रतिस्पर्धी श्री व्यापारी पॅनलने प्रचारामध्ये सभासदांच्या भेटीगाठी घेण्यावरच जोर दिला होता. तसेच ‘क्रॉस वोटिंग’ करू नये याकरिता सभासदांना दोन्ही पॅनलकडून गळ टाकण्यात येत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पॅनलकडून सभासद मतदारांना मतदान स्लिपा घरोघर पोहचविण्यासाठी चांगलेच परिश्रम घेण्यात येत आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलमध्ये काही उमेदवार एकमेकांचे नातेवाईक असल्याने क्रॉस वोटिंग होऊ नये, उमेदवाराने फक्त वैयक्तिक प्रचार किंवा मत मागू नये यासाठी दोन्ही पॅनलचे नेते, पदाधिकारी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आहे. रविवारी मतदानाच्या दिवशी कुठल्या मतदान केंद्रावर कोण उभे राहील, मतदार आणण्यासाठी वाहने आदींचे नियोजन दोन्ही पॅनलकडून केले जात आहे.