शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:42 IST

श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ऋणानुबंध होते. या पाठशाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी भेट घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करीत. जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे अनेक घटनांना उजाळा मिळाला.

नाशिक : श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ऋणानुबंध होते. या पाठशाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी भेट घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करीत. जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे अनेक घटनांना उजाळा मिळाला. नाशिकमध्ये अनेक पीठांचे शंकराचार्य येऊन गेले. त्याचप्रमाणे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी नाशिकला अनेकदा भेट दिली. कुंभमेळ्यादरम्यान आलेल्या शंकराचार्यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. तसेच त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्य केले होते. तत्पूर्वी ते अनेकदा नाशिकला येऊन गेले होते. श्री काळाराम मंदिरालाही त्यांनी भेट दिल्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले. चेन्नई येथे २०१५ मध्ये देखील विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या समवेत त्यांची भेट झाल्याची आठवण पुजारी यांनी सांगितली. नाशिकच्या अनेक वेदसंस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यात महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेवर त्यांची विशेष कृपा होती. सध्या लाखलगाव शिवारात असलेल्या या वेद पाठशाळेला शंकराचार्यांचे विशेष पाठबळ होते. या वेद पाठशाळेचे विद्यार्थी कांची कामकोटी येथील आश्रमात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत. गेल्याच महिन्यात त्यांची भेट घेतल्याचे या वेद पाठशाळेचे संचालक वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांनी सांगितले. रसाळ भाषेत मार्गदर्शन करणाºया शंकराचार्यांच्या हस्ते पैठणे गुरुजी लिखित नित्यब्रह्मो पासनसमुच्चय: या पुस्तकाचे प्रकाशन माटुंगा येथील श्री शंकर मठात करण्यात आले. वैदिक जीवनशैलीने सर्व हित साधावे असे आवाहन शंकराचार्यांनी यावेळी केले होते.शंकराचार्य हे १९८०मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षप्रतिपदेच्या उत्सवासाठी सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या मैदानावर आले होते. त्यावेळी ‘चल चल बंधो संघस्थानम, कांक्षसी यदि निज राष्ट्रोत्थानम’ हे पद्य त्यांच्यासमोर सादर झाले होते, अशी आठवण रमेशराव गायधनी यांनी सांगितली.नाशिकमध्ये प्रार्थनानाशिकमधील महर्षी गौतम वेदविद्या प्रतिष्ठानच्या तपपूर्तीनिमित्ताने शंकराचार्यांनी संस्कृत भाषेत शुभेच्छा संदेश पाठविला होता. या पाठशाळेच्या वतीने शंकराचार्यांना सदगती प्राप्त व्हावी यासाठी इशावास्य उपनिषेदांचे पठण करून प्रार्थना करण्यात आली.

टॅग्स :godavariगोदावरी