शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शरद जोशी यांच्या आठवणी कळवणकरांनी जागवल्या

By admin | Updated: December 12, 2015 23:05 IST

शरद जोशी यांच्या आठवणी कळवणकरांनी जागवल्या

कळवण : शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक, माजी खासदार शरद जोशी यांच्या दु:खद निधनाने कळवण तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या समवेत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनेक आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या स्मृती जागवल्या.व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमी करणे अशी त्यांची भूमिका कळवण तालुक्यातील अनेक शेतकरीपुत्रांना भावली. शरद जोशींनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात शेतकरी संघटनेचे वारे वाहू लागले. कळवण तालुका शेतकरी संघटनेचे केंद्रबिंदू ठरले. संघटनेच्या आंदोलनाची सूत्रे कळवण तालुक्यातून हलवली गेली. १९७९ पासून ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रम राबविल्याने कसमादे पट्ट्यात वसाकाचे संस्थापक उपाध्यक्ष स्वर्गीय साहेबराव देशमुख, वसाकाचे संस्थापक संचालक स्वर्गीय हंसराज पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, माजी आमदार शांताराम आहेर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पवार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव, फुला जाधव, धर्मा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृष्णा पवार, तालुकाध्यक्ष रत्नाकर गांगुर्डे, सखाराम वाघ, कळवण बाजार समितीचे माजी सभापती देवराम कृष्णा पगार, नवीबेजचे माजी सरपंच चंद्रकांत पवार, अशोक पवार, बाजीराव शिंदे, जगन्नाथ पाटील, भास्कर गुंजाळ, कारभारी वाघ, दिलीप कुलकर्णी, सुकदेव बर्वे आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकरी संघटनेची धुरा हातात घेऊन संघटनेचा झंझावात वाढवून कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्र मक भूमिका घेतली.कसमादे पट्ट्यात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कांदा, ऊस पिकांच्या संदर्भात झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची आठवण आजही शेतकऱ्यांच्या स्मरणात आहे.(वार्ताहर)