शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड अन् संगोपनातून जपणार निऱ्हाळी यांच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

निऱ्हाळी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ते राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे होते तसेच साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगड ...

निऱ्हाळी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. ते राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे होते तसेच साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगड होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झालेल्या निऱ्हाळी यांना कारावासाची शिक्षाही झाली हेाती. नाशिकमध्ये आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी दादासाहेब बिडकर यांच्याबरोबर अनेक वर्षे सपत्नीक योगदान दिले. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी देहदानाचा फॉर्मही भरला होता. परंतु कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते शक्य होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निऱ्हाळी यांची शोकसभा नुकतीच ऑनलाइन पार पडली. यावेळी निऱ्हाळी यांच्या स्मृती जपण्यासाठी माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील वृक्ष स्मृतिवनात पाच वृक्ष लावण्यासाठी व संगोपनासाठी रुपये २५ हजारांचा धनादेश स्मारकाचे प्रतिनिधी वसंत एकबोटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते गजानन खातू, सुधीर देसाई, युवराज मोहिते, संजय मं. गो. सचिव राजन इंदुलकर हे उपस्थित होते.

--

-

छायाचित्र आर फोटोवर २४ मधुकर निऱ्हाळी

===Photopath===

220521\09332927242222nsk_7_22052021_13.jpg

===Caption===

मधूकर निऱ्हाळी