शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोरठाण ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:24 IST

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणे गोरठाण येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना चांगलेच महागात पडले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सात जणांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द झाले असून पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड दिला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या खर्चाची माहिती लपवण्याचा दंड पडला महागात

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणे गोरठाण येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना चांगलेच महागात पडले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सात जणांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द झाले असून पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड दिला आहे.डिसेंबर २०२१ मध्ये पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक माधवराव ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सात जागा जिंकून विरोधी आदर्श पॅनलची धोबीपछाड करत विजयाचा धुराळा उडवला. मात्र विजयाच्या धुंदीत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीकडे निवडणुकीचा कोणताच खर्च सादर केला नाही. हेच हेरून विरोधी आदर्श पॅनलचे नेते अशोक ढोमसे यांनी संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर दीड वर्ष सुनावणी चालली अखेर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ज्ञानेश्वर सदाशिव केदारे , ज्योती गोकुळ वाघ, विजय म्हसू बर्डे , रंजना संजय पवार , अनुसया भाऊलाल हांडे , सीमा नवनाथ ढोमसे, दौलत वाळुंबा ढोमसे या ग्रामपंचायत सदस्यांनी खर्च सादर न करून नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले व त्यांची ग्रामपंचायत सदस्य पदे रद्द ठरवली आणि पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याचा देखील दंड केला आहे.राजकीय उलथापालथ होण्याची शक्यातनिफाड तालुक्यात प्रथमच एका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात सदस्यत्त्व पद रद्द होण्याची ही पहिलीच घटना असून या निकालामुळे गोरठाण ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची संकेत निर्माण झाले आहे . या निकालाच्या प्रति जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तहसील कार्यालय निफाड, गट विकास अधिकारी, पंचायत समिती निफाड आणि गोरठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे माहितीसाठी पाठवले आहेत.धन शक्तीचा वापर करून ग्रामविकास पॅनेलने अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली होती, म्हणूनच त्यांचे पदे गेले. आता आगामी निवडणुकीत गोरठाण गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणार आहे.- अशोक ढोमसे, आदर्श पॅनल, गोरठाण.

जनतेने दिलेला कौल नाकारण्याचा प्रकार झाला असून या निर्णयाविरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. निवडणूक झाली तरी गोरठाण गावची जनता आमच्या पाठीशी उभी आहे.- माधवराव ढोमसे, ग्राम विकास पॅनल. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण