शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘नासाका’ विक्रीला सभासदांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:24 IST

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी ...

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांतील १७ हजार शेतकºयांच्या मालकीचा असून, कारखाना उभारणीसाठी अनेक यातना झालेल्या असताना व ५० रुपये गुंठ्याने जमिनी दिल्या असताना विकासाचे केंद्र असलेला कारखाना विक्रीचा घाट जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करीत असून, कारखाना विकत घेऊ पाहणाºयांचे स्वागत शेतकरी हातात रुमणे घेऊन करतील, असा इशारा सभासदांनी वार्षिक सभेत दिला.नासाकाची सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी होते. दोन वार्षिक सभेतील विषय एकमताने मंजूर झाल्यानंतर २०१७-१८ चा चालू हंगाम कशाप्रकारे सुरू करायचा याबाबत सभासदांनी विविध सूचना केल्या. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मुदत होत असताना जिल्हा बॅँकेने कारखाना विक्रीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये तीव्र संतापाच्या भावना व्यक्त झाल्या. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी गत आठ महिन्यांपासून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ करीत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सभासदांपुढे मांडून शासन सातत्याने कारखान्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेने व्याजावर व्याज लावत ते वाढविण्यात आल्याने आज कर्ज ८४ कोटींपर्यंत गेले आहे. गेल्या चार वर्षांपासून कारखान्याचा हंगाम बंद आहे व २०१३ मध्येच कारखाना १०० टक्के एनपीएमध्ये गेल्याने ४७ कोटी रुपये अतिरिक्त व्याजाचा भार टाकला आहे. बॅँकेच्या अधिकाºयांना व संचालक मंडळाला कारखाना विक्रीची घाई झाली असून, ही बाब शेतकºयांसाठी दुर्दैवी आहे. बॅँकेने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र शासन दरबारी दाखल असताना व त्या आधारे शासन कर्जाचे पुनर्गठन करून थकहमीसाठी प्रयत्न करीत असताना बॅँकेने दिलेला दाखला रद्द करणे हा षडयंत्राचा भाग आहे. अशाही परिस्थितीत कारखान्याने बॅँकेला थकीत कर्ज भरण्याची हमी दिलेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात जिल्हा बॅँकेचे ६ संचालक असताना विक्रीबाबत ठराव होतो, ही बाब योग्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच संतू पा. हुळहुळे, प्रकाश जगझाप, बाळासाहेब म्हस्के, अ‍ॅड. सुभाष हारक, बाबुराव मोजाड, बबनराव कांगणे, माधवराव गंधास, अशोकराव खालकर, भिकाजी शिंदे आदींनी विविध सूचना केल्या. सभेत कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. तसेच आगामी गळीत हंगाम २०१७-१८ सुरू करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.