एकलहरे : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण भागात बैठका घेण्यात येत आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता व राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या नियोजनासाठी लाखलगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, कालवी, पाडळी, हिंगणवेढा, कोटमगाव, शिंदे, पळसे, सामनगाव आदी परिसरातून हजारो कार्यकर्ते सभेला घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्टÑवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम धनवटे, जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव ढिकले, उपसरपंच अर्जुन जाधव, तालुका उपाध्यक्ष गोकुळ कांडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक यशवंतराव ढिकले व आभार राजाराम धनवटे यांनी मानले. बैठकीला संतू लोणे, सखाराम निरगुडे, विलास कांडेकर, विनायक कांडेकर, अशोक कांडेकर, गंगाधर वलवे बाबुराव निरगुडे, दीपक सुर्वे, गंगाधर वलवे, संजय जाधव, नरेंद्र चिखले, संजय भांबेरे, नामदेव कांडेकर, निवृत्ती कापसे, साहेबराव पेखळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ग्रामीण भागात बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:07 IST
एकलहरे : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण भागात बैठका घेण्यात येत आहे.
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ग्रामीण भागात बैठका
ठळक मुद्देहजारो कार्यकर्ते सभेला घेऊन जाण्याचा निर्धार राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता