शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात बैठका, व्यूहरचनांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:59 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गावात सर्वच इच्छुक सरपंचपदाचा दावेदार म्हणून राजकीय पावले टाकत आहेत.

ठळक मुद्देसरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने इच्छुकांसमोर पेच

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गावात सर्वच इच्छुक सरपंचपदाचा दावेदार म्हणून राजकीय पावले टाकत आहेत.सरपंचपद आरक्षण निश्चित होऊन निवडणुका झाल्या असत्या तर सरपंच आरक्षणाच्या जागेवर लक्ष केंद्रित करून निवडणुका झाल्या असत्या. परंतु, आता सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने गावपातळीवर पॅनल निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत.

            सरपंचपदांचे आरक्षण काय निघते, हे अनिश्चित असल्याने सध्या तरी वॉर्डावॉर्डात चुरस आहे. संभाव्य आरक्षण गृहीत धरून पॅनल निर्मिती होत आहे. सरपंचपदाची माळ गृहीत धरून वॉर्डावॉर्डात चुरस होण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीत नेत्यांची तर काही ग्रामपंचायतीत सामाजिक कार्यकर्त्यांची कसरत ठरत आहे. काही गावात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तर काही गावात अटीतटीच्या निवडणुका होत असल्याने व्यूहरचना आखल्या जात आहेत.इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकांना सुरुवात होत आहे. वर्षभरात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, बाजार समिती, सहकारी सोसायटीच्या निवडणुका होणार आहेत. सुरुवातीला आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यात टिटोली, बलायदुरी, भरवीर बुद्रुक, कुर्नोली, शेणवड खुर्द, गरुडेश्वर, फांगुळगव्हाण, तळोघ या पंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक