शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती एका दिवसात पूर्ण

By admin | Updated: January 24, 2017 01:03 IST

निवडणूक : २७ जानेवारीला पहिली यादी जाहीर होणार

नाशिक : काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक तर काही ठिकाणी उमेदवार नाही, अशा परिस्थितीत महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एकीकडे राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची चर्चा सुरू असून, तो घोळ मिटत नसल्याने कॉँग्रेसने इच्छुकांच्या माध्यमातून चाचपणी केली आहे. मंगळवारी (दि.२४) छाननी समितीची बैठक झाल्यानंतर नावे राज्य निवड मंडळाकडे पाठविण्यात येणार असून, २७ जानेवारीस रात्री उशिरा नावे घोषित होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने दिवसभरात सर्व मुलाखती पूर्ण केल्या. सायंकाळपर्यंत ८६ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. त्यानंतर ६० अर्ज अद्यापही बाकी असले तरी रात्रीपर्यंत अडीचशे मुलाखती घेण्यात येणार असल्याचे कॉँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. कॉँग्रेस भवन येथे मुलाखतीसाठी गर्दी झाली होती. कॉँग्रेसचे सहायक प्रभारी अविनाश रामेष्टी, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, राहुल दिवे, शैलेश कुटे, गुलाम शेख, वसंत ठाकूर, वसंत आव्हाड, उद्धव पवार, बबलू खैरे यांच्यासह सर्व आघाड्यांचे अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. कॉँग्रेस पक्ष सोडून गेलेले काही नगरसेवक वगळले तर कॉँग्रेस पक्षाच्या सर्वच विद्यमान नगरसेवकांनी मुलाखती दिल्या, एवढेच नव्हे तर कॉँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बबलू पठाण यांनीही मुलाखत दिली.  या मुलाखतीनंतर कॉँग्रेस छाननी समितीची बैठक मंगळवारी (दि.२४) होणार असून, यावेळी बहुतांशी यादीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल कॉँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना देण्यात येणार आहे. २७ जानेवारीस कॉँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक होणार आहे. त्यात उमेदवार निश्चित झाल्यानंतर रात्री यादी घोषित होण्याची शक्यता असल्याचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)