शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अर्भके मृत्यू प्रकरणी आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:08 IST

जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात बाहेरून उपचारासाठी दाखल केली जाणारी कमी वजनाच्या बाळांची मोठी संख्या, द्वितीय श्रेणीमध्ये मोडत असल्याने पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर सुविधेचा अभाव व त्यामुळे वाढणारे बालमृत्यू ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात बाहेरून उपचारासाठी दाखल केली जाणारी कमी वजनाच्या बाळांची मोठी संख्या, द्वितीय श्रेणीमध्ये मोडत असल्याने पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर सुविधेचा अभाव व त्यामुळे वाढणारे बालमृत्यू ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़विभागीय आयुक्त झगडे यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागास भेट देऊन लेव्हल थ्रीच्या स्वतंत्र एसएनसीयू कक्षाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय हे लेव्हल टूचे रुग्णालय असल्याने या ठिकाणी ते शक्य नाही, तर नाशिक महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने यापूर्वीच परवानगी नाकारण्यात आली आहे़ यामुळे केवळ सुपरस्पेशालिटी संदर्भ रुग्णालयाचा एकमेव पर्याय आहे़ जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सोमवारी (दि़११) होणाºया नियमित बैठकीत महेश झगडे यांच्याकडून संदर्भच्या पर्यायाबाबत प्रस्ताव दाखल केला जाण्याची शक्यता आहे़ झगडे यांनी जिल्हा रुग्णालयातील कक्षास भेट दिल्यानंतर मोठ्या संख्येने दाखल होणारी कमी वजनाची अर्भके व मर्यादित इन्क्युबेटर या परिस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली़ दरम्यान, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे सुपरस्पेशालिटी असल्याने या ठिकाणी लेव्हल तीनचा एसएनसीयू कक्ष उभारला जाऊ शकतो़ त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यास संदर्भमध्ये पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर असलेला एसएनसीयू विभाग उपलब्ध होणार आहे़