शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याप्रश्नी उमराणेत पाणी पक्ष चळवळीची बैठक

By admin | Updated: September 29, 2015 00:03 IST

चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याप्रश्नी उमराणेत पाणी पक्ष चळवळीची बैठक

उमराणे : चणकापूरचे पाणी झाडी- एरंडगाव धरणात पडेपर्यंत आंदोलनाचा लढा सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन चणकापूर-झाडी-एरंडगाव वाढीव कालव्याच्या नियोजन संदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी पाणीपक्ष चळवळीचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी केले.पस्तीस ते चाळीस वर्षांपासून प्रलंबित परंतु देवळा तालुक्यातील पूर्व भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा असलेला चणकापूर झाडी-एरंडगाव कालवा सद्यस्थितीत दहिवडपर्यंत येऊन ठेपला आहे. या कालवा पुर्णत्वासंबंधी शासन स्तरावरुन पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली जात नसल्याने दहिवडपासून ते झाडी धरणापर्यंतचे १२ कि.मी.चे काम अद्यापी अपूर्णच आहे. परिणामी या भागातील जनतेला चणकापूर कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा आहे. या कालव्याचे काम त्वरित सुरू होऊन झाडी धरणात चणकापूर कालव्याचे पाणी पडावे यासाठी उमराणे येथे देवळा तालुक्यातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वऱ्हाळे, झाडी, एरंडगाव, सावकारवाडी आदि गावातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना बैठकीस बोलविण्यात आले होते.यावेळी दिलीप पाटील, केदा शिरसाठ यांनी कालव्याविषयी विस्तृत माहिती विषद करून एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. तसेच निंबा वाघ, साहेबराव सूर्यवंशी, छबू ठोके, आबा साळुंके, शिवाजी ठाकरे, धर्मा देवरे, देवानंद वाघ, सुधाकर गांगुर्डे, मनेश ब्राम्हणकार, विजयाताई खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रलंबित चणकापूर झाडी एरंडगाव कालवा पुर्णत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडून एकत्रितपणे सर्वांनी लढा देणे गरजेचे आहे. याकामी सर्वांनी पक्षभेद विसरून काम करावे. आजपर्यंत छोटे-मोठे लढे देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने येथून पुढील लढा हा आगळावेगळा लढा असून जोपर्यंत चणकापूरचे पाणी झाडी धरणात पडणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खंडू देवरे यांनी सांगितले. बैठकीप्रसंगी देवळा तालुक्यातील पुर्व गावातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. टी. पाटील यांनी केले. (वार्ताहर)