नाशिक : काश्मीर खोऱ्यात गेल्या रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. २१) राष्ट्रीय एकता मंचतर्फे सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते.या प्रार्थना सभेत हिंदू, बौद्ध, वैदिक, इस्लाम, पारसी, यहुदी, इसाई, शीख, जैन धर्मातील प्रार्थनेचे वाचन करण्यात आले. तसेच प्रार्थनावाचनानंतर अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना मेणबत्ती पेटवून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देशावरील संकटे नष्ट होऊन देशाचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रार्थना म्हणण्यात आली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, अनिल सुकेणकर, दिलीप सिंग, भारती जाधव, खान नजमुल इस्लाम, पंकज जोशी, शहाबुद्दीन शेख, शेख असिफ, दीपक जाधव, विनायक पाईकराव, जगबीर सिंग आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय एकता मंचतर्फे प्रार्थना सभा
By admin | Updated: September 29, 2016 00:05 IST