शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी आदर्श आचारसंहितेसंदर्भात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदारसंघाची संयुक्त बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (मध्य) विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (बाह्य) गणेश मिसाळ उपस्थित होते.यावेळी मालेगाव शहरासह ग्रामीण भागातील राजकीय पक्षांचे फलक, होर्डिंग्ज, फ्लेक्स तातडीने हटविण्याच्या सूचना आचारसंहिता पथकप्रमुख गटविकास अधिकारी आनंद पिंगळे व मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांना देण्यात आल्या. विश्रामगृहाचा वापर राजकीय कामासाठी करू नये याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. याकामासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बैठकीस तहसीलदार चंद्रदीप राजपूत, अन्नपुरवठा अधिकारी नरेश बहिरम, निवडणूक नायब तहसीलदार रमेश वळवी, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. एस. काथेपुरी उपस्थित होते.राजकीय पक्षांनीही गिरवले व्हीव्हीपॅटचे धडेपेठ : आगामी लोकसभा निवडणुकीची प्रक्रि या सुरू झाली असून, त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत सर्वांचे आकर्षण ठरलेल्या व्हीव्हीपॅट मशीनबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती व्हावी म्हणून तालुकास्तरावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना या मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार हरीश भामरे यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आचारसंहितेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व्हीव्हीपॅट मशीनबाबत मार्गदर्शन करून त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब नवले, आर. व्ही. वराडे यांच्यासह सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय