बैठकीत संघटनेचे संयुक्त कार्यवाह अशोक गरुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. प्रत्येक तालुका व महापालिका यांचे प्रतिनिधी तसेच तीन महिला संघाच्या महिला प्रतिनिधी यांचा या मंडळात समावेश केलेला आहे. तालुकास्तरावर अथवा शहरपातळीवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सराव शिबिरे आयोजित करणे, महिला खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम राबविणे, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून तालुका, विभाग व जिल्हा अशा तीन स्तरावर निवड चाचणी स्पर्धा घेणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बाळासाहेब जाधव यांची खजिनदार तर शरद पाटील व किरण गुंजाळ यांची रिक्त असलेल्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली. उदय सांगळे व गणेश मोरे यांची सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी बाळासाहेब जाधव, सतीश सूर्यवंशी, रंगनाथ शिंदे. वाल्मीक बागुल, शैलजा जैन, शिरीष नांदुर्डीकर, मोहन गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST