बँकेच्या मुख्य कार्यालयातील किसनलाल बोरा सभागृहात अध्यक्ष रिकबचंद बाफणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत इतिवृत्त वाचन तसेच अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार घीया यांनी केले. बँकेचे भागभांडवल १ कोटी ३९ लाख ४६ हजार तर ठेवी ६८ कोटी ५९ लाख ७८ हजारांच्या आहेत. बँकेने विविध बँकात ४७ कोटी ४९ लाख २८ हजारांची गुंतवणूक केलेली असून २३ कोटी ५६ लाख ४७ हजारांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेच्या व्यवहारात मागील वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ झाल्याने तसेच संस्थेने सभासदांच्या व खातेदारांना बँकेशी संलग्न असलेल्या सुविधा एनईएफटी, आरटीजीएस, जीएसटी कर भरणा, उत्पन्न कर भरणा, वीज बिल भरणा, एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाफणा यांनी दिली. संस्थेची थकबाकी अल्प असल्याने एनपीअेचे प्रमाण शून्य असल्याचे तसेच संस्थेस अ ऑडिट वर्ग मिळाल्याचे उपाध्यक्ष हिदायत मुल्ला यांनी सांगितले आहे. सभासदांचे स्वागत संचालक महेंद्र बोरा यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महेंद्र भुतडा यांनी तर आभार संचालक विलास कड यांनी मानले. यावेळी बँकेचे संचालक सुभाष खाबिया, अशोक बागमार, प्रकाश सोनवणे, संजय वाघ, नरेद्र खांडे, अनिता देशमुख, मनीषा वडनेरे, दौलत गावीत, अशोक मोदी, दिनेश सोनवणे, कमलाकर आहेर, विजय बोथरा, प्रकाश बोरा, पारसमल सिसोदिया, शांतिलाल चोपडा तसेच नामदेवराव घडवजे, आर. एल. पाटील, पंढरीनाथ सोनवणे, किशोर बोरा, विलास घडवजे, विलास निरगुडे आदींसह सभासद उपस्थित होते.
250921\25nsk_41_25092021_13.jpg
वणी मर्चंट बँकेची वार्षिक सभा