शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तात्या टोपे स्मारकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:01 IST

स्मारकाच्या जागाबदलावरून पालिका प्रशासन आणि सेनापती तात्या टोपे स्मारक नवनिर्माण समिती यांच्यात तू तू मै मै चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी पालिका पदाधिकारी, प्रशासन आणि समिती यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पालिकेसह समितीची बाजू एकूण घेतली.

येवला : स्मारकाच्या जागाबदलावरून पालिका प्रशासन आणि सेनापती तात्या टोपे स्मारक नवनिर्माण समिती यांच्यात तू तू मै मै चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी पालिका पदाधिकारी, प्रशासन आणि समिती यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पालिकेसह समितीची बाजू एकूण घेतली.नियोजित स्मारकाच्या जागाबदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. स्मारक निर्मितीची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. सर्वदूर विकास व्हावा,या दृष्टीने साठवण तलावालगत नियोजित जागेत स्मारक का नको?असा सवाल उपस्थित करून चर्चेला सुरु वात झाली.समिती अध्यक्ष आनंद शिंदे, नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, रु पेश लोणारी, प्रवीण बनकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक संकलेचा यांनी चर्चेत भाग घेत स्मारक येवला-नासिक रस्त्यावर व्हावे असा आग्रह धरला. पालिकेने स्मारकासाठी निश्चित केलेली साठवण तलावा जवळील जागा लोकवस्तीपासून निर्जनस्थळी व गैरसोयीची आहे. शिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा टप्प्यासाठी ही जागा भविष्यात उपयोगात येणारी आहे.स्मारकाच्या जागा बदलाचा तिढा मात्र कायम आहे. सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागा बदलाचा चेंडू तूर्त तरी पालकमंत्री यांच्या कोर्टात टोलावला गेला. स्मारक होईल पण देखभाल दुरु स्तीचे काय? या प्रश्नावरील चर्चेत ,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी स्मारक समितीने पन्नास टक्के खर्च करावा असा अजब सल्ला दिला.या भूमिकेला समिती अध्यक्ष आनंद शिंदे यांनी मिस्कील होकार देत लोकवर्गणीतून देखभाल दुरु स्ती करू अशी टिप्पणी केली. पण स्मारक पालखेडच्याच जागीच व्हावे असा जोरदार आग्रह धरला.स्मारकाच्या जागेत पालिका उभारणार असलेल्या जागेत दर्शनी भागात गाळे उभारून उत्पन्न घेवू या पालिकेच्या भूमिकेला जिल्हाधिकारी यांनी छेद दिला. व स्मारक प्रवेशाला तिकीट आकारणी करता येणार नसल्याचे बजावले. बैठकीत समिती अध्यक्ष आनंद शिंदे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, बडाअण्णा शिंदे, रा कॉ गटनेते संकेत शिंदे, गटनेते रु पेश लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, गटनेते शिवसेना दयानंद जावळे, प्रमोद सस्कर, अशोक संकलेचा, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेशकुमार बहीरम,बांधकाम अभियंता अभिजित इनामदार, वास्तू विशारद सारंग पाटील, पाटबंधारे उपअभियंता भागवत उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय