नाशिक : सहकार खात्याच्या निर्देशानुसार मजूर संस्थांची नोंदणी करताना त्यांना कार्यक्षेत्र निश्चित करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ई-निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेताना आणि मजूर सहकारी संस्थांना कामाचा ठेका देताना त्या त्या तालुक्यातील मजूर संस्थांनाच सहभागी करून घेण्यात यावे, बाहेरील तालुक्यात संस्थांना मनाई करावी,असा ठराव काल (दि,१२) बांधकाम समितीच्या बैठकीत करण्यात आला.उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत बांधकाम समितीची मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध विभागनिहाय व तालुकानिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. त्यात जिल्हा परिषदेतील विविध विकासकामांचा ठेका ज्या संस्था घेतात त्यामध्ये काही संस्था कामे घेताना मोठ्या प्रमाणात पुढे कमी दराने (बिलो रेट) ठेका घेतात अशावेळी कामाची गुणवत्ता व गती योग्य राहावी,यासाठी हमी म्हणून ज्या संस्था १० टक्के ते १५ टक्के कमी दराने निविदा भरतील. त्यांच्याकडून अतिरिक्त ५ टक्के रक्कम व १५ टक्के व त्यापेक्षा जास्त कमी दराने निविदा भरल्यास अतिरिक्त १० रक्कम सुरक्षा अनामत म्हणून नियमित सुरक्षा अनामत रक्कम व्यतिरिक्त घेण्यात यावी. घेतलेली सुरक्षा अनामत रक्कम दोष दायित्व निवारण कालावधी संपल्यानंतर करण्यात यावी. त्याचप्रमाणे सहकार खात्याच्या नियमानुसार मजूर संस्थांची नोेंदणी करताना त्यांच्या तालुक्याचे कार्यक्षेत्र निश्चित करून देण्यात आलेले आहे.
बांधकाम समिती बैठक : ठराव संमत
By admin | Updated: February 13, 2015 01:12 IST