शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर प्रकल्पासंबंधी १५ दिवसांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:30 IST

कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.

ठळक मुद्देअशोक ऊईके : प्रकल्पाला दिलेल्या भेटीत आश्वासन

कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.ओतूरचे भाजप नेते दादाजी मोरे ,शाबान पठाण ,रमेश रावले ,देवा भुजाडे ,रविकांत सोनवणे,युवराज मोरे ,अशोक मोरे रंगनाथ काळे ,माधव मोरे व अशोक देशमुख यांनी निवेदन देत ओतूर प्रकल्पाची कहाणी कथन करून प्रश्न काम मार्गी लावण्याचे साकडे घातले. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, १९७७ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न असून १५ ते २० गावांचा प्रश्न आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत येत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी ओतूर प्रकल्पाच्या अहवालावरून काय प्रयत्न करता येईल याची संपूर्ण तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ व १०० टक्के आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नामदार उईके यांनी दिली.यावेळी आमदार जे पी गावित, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रकल्प नियोजन समितीचे अध्यक्ष एन डी गावित, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, विकास देशमुख, निंबा पगार, रमेश थोरात, राजेंद्र ठाकरे, गोविंद कोठावदे, अशोक जाधव, टिनू पगार, दीपक वेढणे, भगवान मोरे, हिरामण वाघ, नितीन वाघ, पोपट पाटील, हेमंत रावले आदींसह मान्यवर उपस्थित होते.आश्वासनांवर आश्वासने१९७७ पासून प्रलंबित ओतूर प्रकल्पाचे काम २०१४ मध्ये तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी सुरु केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने प्रकल्पाचे अंदाजपत्रक वाढले. त्यामुळे प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून लालिफतीत अडकला आहे. यापूर्वी तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण ,आमदार जे पी गावित यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तर कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर २०१५ मध्ये आलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर व २०१६ मध्ये आलेले भाजप आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी भेटी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी २०१७ मध्ये उपोषण करून लक्ष वेधले होते. आता केव्हा प्रश्न मार्गी लागतो याकडे लक्ष लागले आहे.