शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:22 IST

अनागोंदी कारभाराने गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अखेर शासनाला लक्ष घालावे लागले असून, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांना तडकाफडकी या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय आरोग्य संचालकांना घ्यावा लागला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन व रुग्णांचे हित लक्षात घेता अनुभवी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

नाशिक : अनागोंदी कारभाराने गाजत असलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अखेर शासनाला लक्ष घालावे लागले असून, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांना तडकाफडकी या पदावरून मुक्त करण्याचा निर्णय आरोग्य संचालकांना घ्यावा लागला आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन व रुग्णांचे हित लक्षात घेता अनुभवी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.  शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे व्यवस्थापन केल्या काही महिन्यांपासून पूर्णत: ढासळून अनागोंदी व गैरप्रकाराने गाजू लागले आहे. त्यात विशेष करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्या विषयी प्रामुख्याने सहअधिकारी व परिचारिकांच्या तक्रारी होत्या. अपमानास्पद वागणूक देणे, रुग्णांशी उर्मट वर्तन करणे आदी स्वरूपामुळे रुग्णालयातील व्यवस्थापन कोलमडून पडले होते. त्याचा परिणाम थेट संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांवर होऊन रुग्णालयाविषयी रुग्णांमध्येच असुरक्षितता निर्माण झाली होती. सफाई कर्मचाºयांकडून रुग्णांवर उपचार करणे, मंजूर नसलेल्या पदांवर वैद्यकीय अधिकाºयांची भरती करणे, कोट्यवधीची यंत्रसामग्री धूळ खात पडणे, कॅन्सरवर उपचारासाठी तंत्रज्ञ नसणे असे प्रकार या दरम्यान उघडकीस आले. रुग्णालयावरील विश्वास कमी झाल्याने तेथे दाखल होणाºया रुग्णांच्या संख्येवरही त्याचा परिणाम झाला, परिणामी अवघड शस्त्रक्रियांची संख्याही घटली. या संदर्भातील तक्रारींची दखल घेत गेल्या आठवड्यात राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनीही संदर्भ सेवा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती तसेच वैद्यकीय अधीक्षकांची झाडाझडतीही घेतली होती.तपासणी करणारकामकाजात सुधारणा होत नसल्याचे पाहून या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी ‘संदर्भ’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापनाचा पदभार काढून घेण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे तातडीने पदभार देण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. या आदेशानुसार डॉ. कोशिरे हे यापुढे रुग्णालयात फक्त रुग्णांची तपासणी करतील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टर