शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवरून खडाजंगी

By admin | Updated: December 22, 2015 23:32 IST

आरोग्य समिती : तीन तास रोखली सभा

नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवरून मंगळवारी (दि.२२) आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत सदस्य व अधिकाऱ्यांची जोरदार खडाजंगी झाली. तब्बल तीन सात सभा रोखून धरण्यात आल्यानंतर सदस्यांना ही रिक्त पदांची माहिती देण्यात आली.मंगळवारी आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांच्या उपस्थितीत आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्णातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती मागविली. उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची माहिती देता न आल्याने समितीची सभा महिला सदस्य डॉ. भारती पवार, मनीषा बोडके, ज्योती तलवारे यांनी तीन तास रोखून धरली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी धावपळ करीत बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे २०८ पदे मंजूर असून, त्यातील १३ पदे रिक्त आहेत, तर १९५ वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे आकडेवारीतून दिसते. कार्यरत १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १६ वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी (पी. जी.) गेले आहेत. तसेच सात वैद्यकीय अधिकारी कोणतीही परवानगी न घेता गेल्या कित्येक महिन्यांपासून परागंदा आहेत. तसेच प्रत्यक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या १७२ असून, पूर्ण क्षमतेने आरोग्य केंद्रांवर सुविधा पुरविण्यासाठी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली. त्यानुसार शासनाकडे रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. दूषित पाण्याचा आढावा घेण्यात आला असता जिल्ह्णात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा मालेगाव - ४२, नांदगाव - ३४, सिन्नर - ३२, बागलाण - २९ या तालुक्यात होत आहे. जिल्ह्णात एकूण १८८३ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २८५ पाणी नमुने (१५ टक्के) दूषित असल्याचे आढळले. डॉ. भारती पवार यांनी दूषित पाण्याच्या स्त्रोतची नियमित पाणी तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाल्या दिल्या. बैठकीस सदस्य ज्योती तलवारे, उत्तम कडू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)