नाशिक - महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात मॅग्मो आयुर्वेद संघटनेने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे़ या संपात फू ट पडल्याचे चित्र आहे़ संपात सहभागी न होण्याबाबत मॅग्मो आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ़ विजय जाधव व सचिव डॉ़ सारडा यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून, यामध्ये म्हटले आहे की, राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या संपाच्या माध्यमातून एम़बी़बी़एस़ अधिकार्यांच्या मागण्या व समस्या नेहमी तातडीने सोडविल्या जातात; मात्र बी़ए़एम़एस़ वैद्यकीय अधिकार्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत़ त्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत़ त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने संघटनेने संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे़ संपास संघटनेचा नैतिक पाठिंबा असेल परंतु कोठेही सहभागी होणार नाही़ मॅग्मो आयुर्वेद संघटनेचे १८०० वैद्यकीय अधिकारी असून राज्यातील तळापर्यंत सेवा देण्यासाठी हे अधिकारी तयार असतील़ तसेच संप काळात कोणतीही रजा न घेता रुग्णसेवेचे कार्य करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे़
वैद्यकीय अधिकार्यांच्या संपात फू ट
By admin | Updated: June 1, 2014 01:18 IST