शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

नाशिक : आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्याने या कामाला लवकरच सुरुवात केली ...

नाशिक : आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्याने या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य सुविधेसाठी विद्यापीठाने केंद्रालाही प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एन. राजभोज, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर विद्यापीठाचे समन्वय डॉ. संदीप गुंडरे, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, पुढील अनेक वर्षांचा विचार करून विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करून आवश्यक तांत्रिक बाबीं व निधीची पूर्तता करावी. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय सुविधेत वाढ होणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करताना अनुभवी तज्ज्ञ वास्तुविशारदाची नेमणूक करावी करून त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी-सुविधांच्यादृष्टीने उत्कृष्ट आराखडा तयार होईल, असे नियोजन करावे. महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या अभ्यासाक्रमांबाबत मराठा विद्याप्रसारक संस्थेसोबत करार करण्यात आला असून तसाच करार लवकरात लवकर जिल्हा सामान्य रुग्णालयाशी करण्यात यावा, असेही भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारमार्फत सर्व आरोग्य संस्थांना निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेदेखील आपल्या स्तरावरून या प्रकल्पाच्या अनुषंगाने निधी उपलब्धीसाठी तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी यावेळी बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती सादर केली. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाशीदेखील लवकरच करार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

---कोट--

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यासोबतच रुग्णालय सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत वाढ होणार आहे. याचा लाभ जिल्ह्याला व्हावा यासाठी इमारतीच्या कामाकाजाला गती दिली जाईल.

- छगन भुजबळ, पालकमंत्री