शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मंुबईकडून पदकांचे शतक

By admin | Updated: June 1, 2014 01:00 IST

आज समारोप : राज्य ज्युनियर जलतरण स्पर्धा

आज समारोप : राज्य ज्युनियर जलतरण स्पर्धानाशिक : येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धेचा उद्या समारोप असून, गेल्या तीन दिवसांमध्ये मंुबईच्या जलतरणपटूंनी जोरदार मुसंडी घेत ५७ सुवर्णांसह पदकांचे शतक पूर्ण केले तर यजमान नाशिककडून नचिकेत बुझरुक याने आज पुन्हा दोन सुवर्ण पटकावत वैयक्तिक चार सुवर्णपदके पटकावली आहेत. नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे गेल्या तीन दिवसांपासून राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धा सुरू आहेत. सदरच्या स्पर्धा राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेचा उद्या समारोप आहे. विविध जलतरण स्पर्धांमधून मुंबईच्या जलतरणपटंूनी आजही निर्विवाद वर्चस्व राखत १६ सुवर्ण पदके पटकावत एकूण ४१ पदके पटकावली तर सुवर्णांचे अर्धशतक केले असून एकूण पदतालिकेत १३७ पदकांसह अग्रस्थान कायम राखले. २१ सुवर्णांसह ७२ पदके पटकावत पुणे दुसर्‍या, ठाणे तिसर्‍या तर नाशिक चौथ्या स्थानी आहेत. पुणे-मंुबईच्या जलतरणपटूंमध्ये आज चुरशीचे सामने झाले. या तुलनेत यजमान नाशिककडून फक्त नचिकेत बुझरुकचीच चमकदार कामगिरी झाली. त्याने आजही २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर माणिक चतुर्भुज, सिद्धी कोतवाल यांनी फ्रिस्टाईलमध्ये रौप्य पदक पटकावले. श्रेयस वीरगावकरने कांस्य पदक पटकावले. पदतालिका जिल्हा सुवर्णरौप्यकांस्यएकूणमंुबई५७४४३६१३७पुणे२१२८२३७२ठाणे९१०९२८नाशिक ५४७१६स्पर्धेचा निकाल : पदक विजेते खेळाडू सुवर्ण, रौप्य, कांस्य या क्रमाने...२०० मीटर बटरफ्लाय मुले : पार्थ राने (पुणे), जॉशन स्मिथ (मुंबई), निकोलन फर्नांडिस (मंुबई)२०० मीटर बटरफ्लाय मुली : आकांक्षा बुचडे (पुणे), नूपुर कदम (ठाणे), ज्योती पाटील (मुंबई)२०० मीटर बटरफ्लाय मुले : नचिकेत बुझरुक (नाशिक), वेदांत खांडेपारकर (मुंबई), नील रॉय (मंुबई)२०० मीटर बटरफ्लाय मुली : त्रिशा कारखानीस (ठाणे), सिद्धी कारखानीस (पुणे), राधिका गावडे (मंुबई)५० मी. फ्रिस्टाईल मुले : विराज प्रभू (ठाणे), इशान बिमाणी (मुंबई), निमिश मुळे (वर्धा)५० मी. फ्रिस्टाईल मुली : त्रिशा बिमाणी (मुंबई), जिया कामटे (मंुबई), आकांक्षा बुचडे (पुणे)५० मी. फ्रिस्टाईल मुले : नचिकेत बुझरुक (नाशिक), दिव व्होरा (मंुबई), मिहीर आंब्रे (पुणे)५० मी. फ्रिस्टाईल मुली : सना भाभा (मंुबई), मल्लिका बैखरीकर (मुंबई), सदानी धुरी (पुणे)१०० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : धु्रव पटेल (ठाणे), करण धर्माधिकारी (कोल्हापूर), वरद कुलकर्णी (मुंबई)१०० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : इशा खाडी (ठाणे), मनस्वी मोहिते (नागपूर), इशा राडिया (मंुबई)५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : सिद्धार्थ संख्ये (मुंबई), विराज प्रभू (ठाणे), ओमकार नेहेते (मंुबई)५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : स्वराली कोकीळ (पुणे), अंतरा अग्रवाल (मंुबई), ऋतुजा देसाई (कोल्हापूर)५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : ख्रिस फर्नांडिस (मुंबई), दिव व्होरा (मुंबई), आर्यन केदारे (ठाणे)५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली : आदिती नाझरे (मंुबई), अपेक्षा शेरेराव (ठाणे), युक्ता वखारिया (पुणे)५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुले : अथर्व ओक (पुणे), इंद्रनिल भिडे (पुणे), यश पत्की (मंुबई)५० मी. बटरफ्लाय मुली : केनिशा गुप्ता (मंुबई), अन्या त्यागी (ठाणे), निशा अग्रवाल (पुणे)५० मी. बटरफ्लाय मुले : अन्वेश प्रसादे (पुणे), मीत मखिजा (मंुबई), अरमान सिखा (मंुबई)