शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

By admin | Updated: August 14, 2016 21:56 IST

जनतेच्या जिवाशी खेळतेय यंत्रणा

 स्थळ : सटाणा वेळ : दुपारी २ वाजताबागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रावरील पूल ब्रिटिश राजवटीत बांधला गेला. ब्रिटिशांच्या पत्रव्यवहारानुसार त्याची मुदत बारा वर्षांपूर्वीच संपली आहे. तरीदेखील तग धरून आहे. महाडच्या घटनेनंतर जागरूक यंत्रणा म्हणून ठेंगोडा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा देखावा करण्यात आला; मात्र ज्या पुलावरून जाताना बांधकाम विभागाने कमकुवत पूल असल्याची चेतावणी दिली आहे त्या ताहाराबादच्या मोसम नदीपात्रावरील पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या जड वाहनांना मज्जाव केला जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्तरच्या दशकात बागलाण तालुका तसा दुर्गम म्हणूनच ओळखला जात होता.दळणवळणाच्या माध्यमातून या भागाचा विकास होईल म्हणून प्रशासनाने ताहाराबादच्या मोसम नदीवर १९६४ मध्ये पूल बांधण्यात आला. २००६-०७ पर्यंत हा पूल सुस्थित होता. परंतु सोग्रस ते दहीवेल पर्यंतच्या विंचूर-प्रकाशा मार्गाचे ‘‘बीओटी’’ तत्त्वावर रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे धुळेमार्गे जाणारी अवजड वाहतूक जवळचा मार्ग म्हणून यामार्गाने निघाली. वास्तविक संबंधित विभागाचे अवजड वाहतुकीबाबत सहा महिने सर्वेक्षण झाले होते. त्याच वेळी पुलाच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक होत असल्यामुळे ताहाराबादच्या पुलाला समांतर पूल घेणे आवश्यक होते.संबंधित यंत्रणेच्या या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांच्या काळात चार ते पाच वेळा वाहतुकीला अडथळा आल्यामुळे पुलाची मलमपट्टी करण्यात आली आहे. वाहतूक इतकी मोठ्या प्रमाणात आहे की दर सहा महिन्यात पुलावरील डांबर उखडून खड्डे पडतात. त्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून पुलाला प्रचंड हादरे बसतात. या वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे या पुलाला मोठमोठे तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. कठडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे केव्हाही दुर्घटनेस निमंत्रण मिळू शकते.१ औरंगाबाद-आहवा राज्य मार्गावरील अंतापूर ते हरणबारी दरम्यान रस्त्यावर नव्वदच्या दशकात बांधलेल्या चारही पुलांचे कठडे तुटले आहेत. तीच अवस्था हरणबारी धरणावरून जौतापूर, बोऱ्हाटे, मोहलांगी, शबरीधामकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सांडव्यावर पूल बांधण्यात आला आहे; मात्र त्याच्या एका बाजूचे कठडेच नाहीत तर दुसऱ्या बाजूचे निखळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. कठडे नसल्यामुळे वाहनचालकाला पुलाचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताला निमंत्रण आहे. तर दुसरीकडे या पुलाच्या दोन्ही बाजूंना अक्षरश: झाडे अवतरली आहे. वटवृक्ष, पिंपळ, निंबाचे मोठमोठी झाडे उगवली आहे. ही झाडे वेळीच न तोडल्यामुळे झाडांच्या मुळ्या बांधकामात घुसून पुलाला तडे गेले आहेत. वास्तविक दर सहा महिन्यात पुलाच्या आजूबाजूला उगवणाऱ्या झाडांची सफाई करणे आवश्यक असताना ती देखभाल कागदोपत्रीच होत असल्याचे दिसून येत आहे. हलगर्जीपणामुळे पूल कमकुवत होऊन तुटलेल्या कठड्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचे भयावह चित्र आहे