वडेल : एकाच दिशादर्शक फलकावर वेगवेगळ्या दिशेकडे एकच गाव दर्शविल्याचा फलक लावल्याने प्रवासी व वाहनचालकांची तारांबळ झाल्याचे चित्र डाबलीजवळ पहावयास मिळत आहे.डाबली-मालेगाव रस्त्यावर डाबली- कुकाणे व वजिरखेडे ही तीन गावे एकाच फलकावर दाखविण्यात आली आहेत. परिसरात येणाऱ्या नवीन वाहनधारकांची अडचण होत असून हा फलक दिशादर्शक फलक आहे की दिशाभूलदर्शक फलक आहे? याबाबत वाहनधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.डाबली परिसरात कुकाणे, वजिरखेडे, काष्टी, सुभाषवाडी आदि गावे असून या रस्त्यावर अनेक कोंबडीपालक व्यावसायिकही राहतात. त्या व्यावसायिकांकडे पक्षी वाहतूक करणारे तसेच कोंबडी खाद्य, अंडी वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. शिवाय ही वाहने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अथवा परराज्यातूनही येत असतात; मात्र या ठिकाणी डाबली गावाजवळ लावलेला चुकीचा दिशादर्शक फलक वाहन चालकांची दिशाभूल करीत असून रात्री-बेरात्री येणाऱ्या वाहनचालकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दिशादर्शक फलकाचे नामकरणच वाहनधारकांनी दिशाभूलदर्शक फलक असे केले असून हा फलक दुरुस्त करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
फलक दिशादर्शक की दिशाभूलदर्शक
By admin | Updated: September 26, 2016 00:18 IST