शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 16, 2017 01:31 IST

लक्षवेधी ठरणार लढत : सेना, भाजपासमोर मनसेचे आव्हान

 संदीप झिरवाळ पंचवटीमनसे, भाजपा व शिवसेना या प्रमुख पक्षांचे उमेदवार प्रभाग ६ मधून नशीब अजमावत असून, यंदा महापौरपद अनुसूचित जमातीसाठी असल्याने या गटातून निवडून आलेला कोण्या एका पक्षाचा उमेदवारही उद्याच्या महापौरपदाचा दावेदार ठरू शकतो, त्यामुळे ही लढत शहरातील सर्वात लक्षवेधी ठरणार आहे. प्रभागात गेल्या निवडणुकीत मनसे, शिवसेना, अपक्ष व भाजपाचे प्राबल्य होते. पूर्वीचा प्रभाग क्रमांक ६ व ७ मिळून नवीन प्रभाग ६ ची रचना करण्यात आलेली आहे. विद्यमान महापौर अशोक मुर्तडक याच प्रभागातून निवडणूक रिंगणात असल्याने भाजप, शिवसेनेसमोर त्यांना लढत देण्याचे आव्हान ठरणार आहे. या प्रभागात चार विद्यमान तर दोन माजी व एक नगरसेवक पत्नी असे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून अ गटाच्या अनुसूचित जमाती जागेसाठी माजी नगरसेवक पुंडलिक खोडे भाजपाकडून रिंगणात आहेत. खोडे पूर्वी दोनदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे यांनी मनसेत प्रवेश केल्याने त्यांची पत्नी चित्रा तांदळे मनसेकडून रिंगणात आहेत. भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रा. परशराम वाघेरे यांना भाजपाने उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंडखोरी करून शिवबंधन हाताशी बांधल्याने ते शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक मनीषा हेकरे सेनेकडून रिंगणात उतरल्या आहेत. गेल्यावेळी त्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवार म्हणून पंचवटीतून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरेश आव्हाड यांच्या पत्नी कविता आव्हाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून सुनीता पिंगळे, मनसेकडून शीतल थोरात या निवडणूक लढवित आहेत. ब गटात कॉँग्रेस वगळता शिवसेना, मनसे, भाजपा व राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. क सर्वसाधारण महिला गटात भाजप नेते सुनील बागुल यांच्या मातोश्री माजी नगरसेवक भिकुबाई बागुल या भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. मनसेने छाया काकड तर शिवसेनेने लंकाबाई शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. बागुल यांनी यापूर्वी प्रभागाचे नेतृत्व केल्याने मनसे, शिवसेनेच्या उमेदवारांची लढाई भाजपाबरोबर होण्याची शक्यता आहे. ड सर्वसाधारण गटात विद्यमान महापौर अशोक मुर्तडक हे पुन्हा रिंगणात आहेत. मुर्तडक हे तीन वेळा शिवसेना तर गेल्यावेळी मनसे असे चार वेळा निवडून आलेले आहेत. गेल्या निवडणुकीत अपक्ष व नंतर भाजपात दाखल झालेले विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. ते पूर्वी स्वीकृत नगरसेवकही होते. शिवसेनेने दीपक पिंगळे यांना उमेदवारी दिलेली आहे. ड गटातील प्रमुख लढत मुर्तडक, मानकर व पिंगळे यांच्यात होणार असून ब व ड गटात एकाच जातीचे उमेदवार व एकाच भागातील रहिवासी असलेले काही उमेदवार समोरासमोर येत असल्याने मतांची काहीशी विभागणी होण्याची शक्यता आहे. ड गटात मनसेच्या बंडखोरासह अन्य दोन अपक्ष रिंगणात आहेत.