शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉप टेन’बाबत महापौरच साशंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:04 IST

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. सोमवारी (दि.८) एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम दिला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ सर्वेक्षण : शिवसेनेकडून चमकोगिरीबद्दल टीकास्त्रमुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. सोमवारी (दि.८) एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम दिला आहे.दरम्यान, शिवसेनेने मात्र स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली दररोज पदाधिकाºयांकडून होत असलेल्या दौºयाबद्दल टीकास्त्र सोडत ‘ही तर केवळ चमकोगिरी’ असल्याची संभावना केली आहे.मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या कारकिर्दीत नाशिकने पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला भेट दिली त्यावेळी दिला होता. त्यानंतर, मागील महिन्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पुन्हा जाणीव करून दिली होती. त्यानंतर, गेल्या १ जानेवारीपासून महापौरांसह सत्ताधारी भाजपाचे मनपातील सर्व पदाधिकारी रोज सकाळी पाहणी दौरे करत प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढताना दिसून येत आहेत. या दौºयाचे काही परिणामही दिसून येत आहेत. परंतु, सोमवारी (दि.८) रावसाहेब थोरात सभागृहात अवयवदानासंबंधी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांनी बोलताना नाशिक हे पहिल्या दहामध्ये येणार नाही, हे मलाही माहिती आहे परंतु, आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. टॉप टेन शहरामध्ये नाशिक येणार नाही, हे महापौरांनी सांगून टाकल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्धास्त झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी स्वच्छ मिशन स्वच्छ सर्वेक्षणमहापालिकेत प्रत्येक अधिकारी हा सध्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मिशनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे आपली कामे घेऊन येणाºया आम नागरिकांना संबंधित अधिकाºयांची भेट दुरापास्त झाली आहे. काही अधिकाºयांना नगरसेवकांनी कामासाठी फोन केले तर आपण महापौरांच्या दौºयात आहोत अथवा स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात आहोत, अशी उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत.