लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पंचवटी विभागीय कार्यालयात कामकाजाची वेळ सुरू होऊनही वेळेत हजर नसलेल्या अधिकारी, लिपिक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना महापौर रंजना भानसी यांनी चांगलेच फैलावर घेतले. महापौरांच्या अचानक भेटीत २७ कर्मचारी उशिरा कामावर आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश भानसी यांनी उपायुक्तांना दिले. गुरुवार, दि. ६ रोजी ‘लोकमत’ चमूने पंचवटी विभागीय कार्यालयातील कारभारावर प्रकाश टाकणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्यात कार्यालयातील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी हजर नसल्याचे तसेच कार्यालयात शुकशुकाट असल्याचे निदर्शनास आले होते. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची दखल घेत महापौर भानसी तसेच मनपा उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्यासह नगरसेवक अरुण पवार, जगदीश पाटील यांनी
लेट लतिफांना महापौरांचा दणका
By admin | Updated: July 8, 2017 00:32 IST