शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

By admin | Updated: August 11, 2014 00:57 IST

मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

 नाशिक : भाऊ-बहिणीतील पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राखीपौर्णिमेचा सण शहर परिसरात पारंपरिक उत्साहात साजरा झाला. त्याच्या तयारीसाठी भगिनींची आठवडाभरापासून लगबग सुरू होती. लाडक्या बंधुरायाला ओवाळत राखी बांधून भगिनीवर्गाने प्रेमाचे बंध आणखी दृढ केले. रक्षाबंधनानिमित्त शहरातील किरकोळ बाजारपेठेत चांगली उलाढाल झाली. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना करते, तर भाऊही बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. घरोघरी पारंपरिक उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या सणाचे वेध पंधरवडाभर आधीच लागतात. बहीण विवाहित असल्यास भाऊ तिच्या घरी जाऊन राखी बांधून घेतो, तर काही विवाहित भगिनी खास रक्षाबंधनासाठी माहेरी येतात.शहरात महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ आदि भागांत मनमोहक राख्यांची दुकाने थाटली होती. तेथे राख्यांच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होती. यंदा रक्षाबंधनासाठी सकाळऐवजी दुपारी किंवा सायंकाळी योग्य मुहूर्त असल्याचे संदेश शनिवारी व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता. त्यामुळे अनेकांनी सायंकाळी रक्षाबंधन साजरे केले. काही भगिनींनी दूरवरच्या भाऊरायासाठी पूर्वीच टपाल किंवा कुरिअरद्वारे राख्या पाठवून दिल्या. काहींनी आॅनलाइन राख्या पाठवण्याच्या सुविधेचा वापर केला. (प्रतिनिधी)