या साहित्य संमेलनात यापूर्वी सर्वश्री. प्रा.डाॅ. द.ता.भोसले, प्रा.डाॅ. तारा भवाळकर, डाॅ. लक्ष्मीनारायण बोल्ली, वामन होवाळ , प्रा.डाॅ. रवींद्र शोभणे , सुधाकर गायधनी, रा.रं. बोराडे , लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल , प्रा.डाॅ.यशवंत पाठक , फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे , वसंत आबाजी डहाके , प्रा.डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डाॅ. सदानंद मोरे, प्रा. डाॅ. म.सु. पगारे , अशोक कोतवाल (नियोजित) या मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे कोरोनाचे निर्बंध उठल्यावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक शाखेचे शहराध्यक्ष सावळीराम तिदमे यांनी दिली. धुप्पड यांच्या नावावर आजपर्यंत २५ ग्रंथ संपदा प्रकाशित असून त्यात काव्यसंग्रह, बालकाव्यसंग्रह, अनुवादित, बालकथा,काव्य यांचा समावेश आहे. त्यांचे चला कवितेच्या गावाला, पहिली माझी ओवी गं , बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, बालकवी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. संमेलनाची तारीख , संमेलनाचे उद्घाटक, समारोपीय सत्राचे अध्यक्ष याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.
सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माया धुप्पड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST