शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कमाल तपमान @ ३८ : नाशिककरांना वाढत्या ऊन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:19 IST

मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला.

ठळक मुद्देमार्चअखेर कमाल तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे

नाशिक : हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वात उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चांगलाच जाणवला.मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. रविवारी कमाल तपमानाचा पारा ३७ अंशापुढे सरकला होता; मात्र किमान तपमान कमी असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता व उष्ण वातावरण सुर्यास्त होताच तितक्याच वेगाने थंड होत होते. रात्री थंड वाराही काही भागात सुटल्याचे नागरिकांनी अनुभवले; मात्र सोमवारी कमाल व किमान तपमानात वाढ झाल्याने वाऱ्याचा वेग मंदावला व वातावरणात उष्माही जाणवत होता. त्यामुळे रात्रीही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. मार्चअखेर कमाल तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत उष्ण वातावरण वाढणार असून नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास बाहेर पडताना उन्हापासून बचावाची योग्य ती खबरदारी घ्यावी. घरातून निघताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही १८ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणातील आर्द्रताही वाढू शकते, यामुळे नाशिककरांना उकाडा व घामाचा त्रास अधिक सहन करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे उष्मा वाढत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.शीतपेयांसह टोप्या, स्टोलला मागणीवाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून शीतपेयांनापासून उष्णतेपासून अंगाची होणारी काहिली थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबरोबर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी टोप्या, स्टोल, सनकोट, गॉगल्सला मागणी वाढत आहे. यामुळे या वस्तूंच्याही किंमतींमध्ये वाढ झाली असून विक्रेत्यांकडून कुठल्याहीप्रकारे किंमतीमध्ये तडजोड न करता भावावर ठाम राहून वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर उसाच्या रसाचे गु-हाळ, लिंबू सरबत, मसाला ताक, अननस, संत्री, मोसंबी ज्यूस विक्रीची दुकाने थाटली असून दुकानांवर गर्दी होऊ लागल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NashikनाशिकHeart Attackहृदयविकाराचा झटका