शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

स्मशानातील रॉकेल गैरव्यवहाराच्या सरणावर !

By admin | Updated: June 20, 2014 00:50 IST

मनमाड : येथील अमरधाममध्ये गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी रॉकेल उपलब्ध होत नसल्याने महागड्या पेट्रोल - डिझेलचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

मनमाड : येथील अमरधाममध्ये गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी रॉकेल उपलब्ध होत नसल्याने महागड्या पेट्रोल - डिझेलचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे स्मशानातील रॉकेल चक्क गैरव्यवहाराच्या ‘सरणावर’ जाऊन पोहोचले की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहे.शहरातील वैकुंठधाम या प्रमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शासकीय दरात उपलब्ध होणारे रॉकेल तब्बल दोन वर्षांपासून गायब असल्याने येथील जीवनाच्या अंतिम समयीसुद्धा महागडे पेट्रोल - डिझेल वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे. या ‘स्मशानातील रॉकेल’मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.मनमाड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी दरमहा १०० ते १२५ लिटर रॉकेलचा अधिकृत शासकीय कोटा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कार व्यवस्थेसाठी स्मशानभूमीत रॉकेल उपलब्ध झालेले नाही.या कालावधीमध्ये मनमाड शहरातील तसेच रेल्वे अपघातातील सुमारे ४३८ मृतदेहांचे अंत्यसंस्कार खासगी पेट्रोलपंपावरून महागडे डिझेल व पेट्रोल वापरून करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.शासनाच्या बेजबाबदारपणामुळे जीवनाच्या अंतिमसमयीदेखील महागडे पेट्रोल व डिझेल वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे. या दुर्दैवाला कारणीभूत असलेल्या अकार्यक्षम शासनाने त्वरित या प्रकरणात लक्ष घालून मनमाड स्मशानभूमीसाठी असलेला सहामाही ६०० लिटर रॉकेलचा कोटा वाढवून १००० लिटरचा करावा तसेच रॉकेल वेळेवर उपलब्ध करून द्यावेतसेच २०१२ पासून रॉकेल पुरवठा का झाला नाही व त्यात काय गैरव्यवहार झाला याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे भाजपाच्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)