नाशिक : वाढती व्यसनाधीनता ही प्रत्येक समाज व धर्मासाठी किंबहुना मानवजातीसाठी घातक ठरणारा असा भयावह रोग आहे. देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी यामध्ये अडकत चालली असून, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. राष्ट्राच्या बळकटीसाठी व सुरक्षेसाठी व्यसनमुक्त समाजनिर्मिती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीचे प्रचारक व हाशमीया विद्यालयाचे प्राचार्य मौलाना मुहम्मद रिजवान खान यांनी केले. सुन्नी दावत-ए-इस्लामी व उस्मानिया समितीच्या वतीने आगामी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पखालरोड येथे आयोजित व्यसनविरोधी जनजागरण परिषदेत खान प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ज्याप्रमाणे अग्नी केवळ जाळायचे काम करते त्याप्रमाणे नशेची झिंगदेखील समाज उद््ध्वस्त करते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यसनाधीनता ही केवळ कोणत्या ठराविक धर्म, जात-पातीच्या लोकांसाठी विनाशकारक आहे,असा गैरसमज करून घेणे अत्यंत चुकीचे आहे.
राष्ट्राच्या बळकटीसाठी व्यसनमुक्ती गरजेची मौलाना रिजवान खान : ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत प्रबोधनपर परिषदेत प्रतिपादन जुने
By admin | Updated: December 29, 2014 01:32 IST