नाशिक : मातोरी येथे खरेदी केलेल्या १८७ एकर जमीन प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तक्रारदार व त्यांच्या भागीदाराकडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी संशयित पंडित रंगनाथ कातड, रामदास बाळू पिंगळे, मोतीराम ढेरिंगे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अर्जुन रामचंद्र खेतवाणी (वय ७५,रा़उंटवाडी) यांनी या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे़ खेतवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून, २०१३ मध्ये त्यांनी मातोरी शिवारातील गट नंतर १८०, १८१ / २, १८३, १८७ मधील एकूण १८७ एकर जमीन ग्रामविकास मंडळ पंच व सभासद यांच्याकडून खरेदी केली़ या खरेदीनंतर तब्बल एक वर्षानंतर या जमिनीचे अधिक पैसे मिळावेत या हेतुने संशयित पंडित रंगनाथ कातड, रामदास बाळू पिंगळे, मोतीराम ढेरिंगे यांनी मातोरी गावातील मूळमालकांना खोटे सांगत त्यांची दिशाभूल करीत मिळकतीचे कामकाज करण्यासाठी जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला़
जमीन खरेदी प्रकरणी एक कोटींच्या खंडणीची मागणी मातोरी जमीन प्रकरण : कातड, पिंगळे व ढेरिंगे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Updated: May 3, 2015 01:27 IST