नाशिक : दहा दिवसीय बालिकेला सोडून तिच्या आईने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे़ या घटनेची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर परिसरातील एक गर्भवती महिला गुरुवारी (दि़ १०) जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती़ सिंहस्थातील दुसऱ्या पर्वणीला या महिलेला मुलगी झाली़ यानंतर ही महिला रुग्णालयात उपचार घेत होती़ मंगळवारी (दि़ २२) दुपारच्या सुमारास या महिलेने आपल्या दहा दिवसीय नवजात मुलीला सोडून रुग्णालयातून पलायन केले़ या नवजात मुलीचा सांभाळ रुग्णालयातील परिचारिका करीत आहे़त (प्रतिनिधी)
बालिकेला सोडून मातेचे पलायन
By admin | Updated: September 23, 2015 00:17 IST