शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

By admin | Updated: August 31, 2016 00:49 IST

बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

नाशिकरोड : राजस्थानच्या चौघा युवकांना बनावट कागदपत्रे व सही-शिक्के मारून आर्टिलरी सेंटरमध्ये भरती केल्याचे दाखवत फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाइंड सेवानिवृत्त कर्नल सुखप्रितसिंग अर्जुनसिंग रंधवा (५९, बी-६१, सेक्टर ४०, नोएडा, उत्तर प्रदेश) यास नाशिक पोलिसांनी दिल्लीतून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़ या रॅकेटमधील एजंटला उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती़ दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, दोनजण फरार आहेत़ राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील बलबीर रामचंद्र गुजर, सुरेशकुमार शिवचरण महंतो, सचिनकुमार किशनसिंह, तेजपाल मोतीराम चोपडा या चौघांनी व त्यांच्या नातेवाइकांनी आर्टिलरी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी एका टोळीला पैसे दिले होते. त्यांनी दिलेल्या बनावट कागदपत्र व सही शिक्क्यावरून हे चौघेजण नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये गेल्या जुलै महिन्यात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये संशय आल्याने अधिक माहिती घेण्यात आली. त्यामध्ये राजस्थानच्या चौघा युवकांनी लष्करात दाखल होण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील लष्करी शिपाई गिरीराजसिंग घनश्यामसिंग चौहान याला अटक केली होती. वरील पाचही संशयितांची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. लष्करात भरती करण्यासाठी युवकांना खोटी कागदपत्रे व नियुक्तीपत्रे देणाऱ्या टोळीचा एजंट टेकचंद चितरराम मेघवाल (रा. मातोर, जिल्हा अल्वर, राजस्थान) याला उपनगर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतल्यानंतर त्यास न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, या बोगस सैन्यभरती करणाऱ्या रॅकेटचा मास्टरमार्इंड रंधवा पकडला गेल्याने त्यांनी किती व कशी युवकांची फसवणूक केली हे समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)