नाशिकरोड : राजस्थानच्या चौघा युवकांना बनावट कागदपत्रे व सही शिक्के मारून भरती केल्याचे दाखवत फसवणूक करणारा या रॅकेटचा मास्टरमाइंड सेवानिवृत्त कर्नल सुखप्रितसिंग रंधवा याला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील बलबीर रामचंद्र गुजर, सुरेशकुमार शिवचरण महंतो, सचिनकुमार किशनसिंह, तेजपाल मोतीराम चोपडा या चौघांनी व त्यांच्या नातेवाइकांनी आर्टिलरी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी एका टोळीला पैसे दिले होते. त्यांनी दिलेले बनावट कागदपत्र व सही शिक्क्यावरून हे चौघे जण नाशिकरोड आर्टिलरी सेंटरमध्ये गेल्या जुलै महिन्यात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते.
लष्कर भरतीचा मास्टरमाइंड रंधवा पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: September 2, 2016 01:17 IST