नाशिक : द्वारकेजवळील नासर्डी पुलालगतच्या झोपडीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यापैकी पतीस मारहाण, तसेच झोपडी पेटविण्याची धमकी देत ५५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवार, सोमवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास संशयित सुरज सुनील तसंबड (२५), अनिल सुनील तसंबड (२५) व योगेश फावरी (वय ४५, तिघेही रा. बागवानपुरा) हे बळजबरीने घरात घुसले़ यानंतर पतीस पकडून झोपडीच्या बाहेर नेऊन बेदम मारहाण केली व झोपडी जाळून टाकण्याची धमकी दिली़ यानंतर पतीला पकडून ठेवत या तिघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला़यानंतर पीडित महिलेने भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फिर्याद दिली़ या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली़ तसेच वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन सहायक पोलीस निरीक्षक शेळके, पोलीस नाईक पठाण, गाढवे तसेच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी यातील तिन्ही संशयितांना अटक केली़ पीडित महिला ही आदिवासी समाजाची असून, बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)
पतीस मारहाण करून महिलेवर सामूहिक अत्याचार
By admin | Updated: July 13, 2015 23:55 IST