शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:42 IST

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या खुंटविहीर येथे एका गतिमंद विवाहितेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. १६) मध्यरात्री एक ते सकाळी आठ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी दीपक काशीराम पवार, रा. खुंटविहीर, दीपक आनंदा पवार, रा. मोहपाडा (खु), सुरेश शिवराम शेवरे, रा. मालगोंदा, अशोक उणाजी गायकवाड, रा.भाकुर्डी, ता. कळवण यांनी मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे समजते. या चौघांनी गतिमंद विवाहितेस फूस लावून गावाच्या पश्चिमेस खुंटविहीर परिसरातील एका शेतातील झापावर नेले व आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. रात्री कुठे होतीस, अशी विचारणा पीडितेच्या बहिणीने सकाळी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडितेच्या बहिणीने तिच्या गतिमंद बहिणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बोडखे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटना समजताच तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व योग्य ते सबळ पुरावे हाती आल्यास संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकRapeबलात्कार