शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:22 IST

मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील एका तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड भागात घडली. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले असून, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत  एका संशयित महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे.

नाशिक : मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील एका तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड भागात घडली. या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले असून, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत  एका संशयित महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील एकलहरा रोडवर सहा संशयितांनी एका तेरा वर्षे वयोगटांतील अल्पवयीन मुलीवर सामूहिकरीत्या अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. आई-वडील मोलमजुरीच्या कामाला गेले असताना, दिवसभर घरात मुलगी एकटीच होती. जेव्हा संध्याकाळी आई घरी परतली असता, घरात मुलगी आढळून आली नाही. मुलीचा परिसरात शोध घेत असताना, ती भेदरलेल्या अवस्थेत एका घराच्या गच्चीवर आईला मिळून आली. आईने तिला दिलासा देत तत्काळ घरी आणले आणि विश्वासात घेऊन विचारले असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर, रात्रीच्या सुमारास आईने नाशिक रोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानुसार, पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तातडीने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पथकाला त्यांच्या शोधार्थ रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी शहर व परिसरात शोधमोहीम राबवित पहाटेपर्यंत या गुन्ह्यातील सर्व संशयितांना अटक केली. यामध्ये संशयित दीपक समाधान खरात (१९, रा.सिन्नरफाटा), रवी संतोष कुऱ्हाडे(१९, रा.पांडवलेणी), आकाश राजेंद्र गायकवाड (२४, रा. रेल्वे ट्रॅक्शन), सुनील निंबाजी काेळे (२४,रा.आम्रपाली झोपडपट्टी), सोमनाथ विजय खरात (१९, रा.गुलाबवाडी) यांच्यासह अन्य एक संशयित महिलेचा समावेश आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नाशिक रोड पालीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सर्व संशयितांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने सहा दिवसांची शनिवारपर्यंत (दि.१६) पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी संशियत महिलेने संबंधित संशयितांना सहकार्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेचा सखोल तपासमाणुसकीला काळिमा फासणाऱ्या व मानवी संवदेनांना हेलावून टाकणाऱ्या  या घटनेचा सखोल तपास नाशिकरोड पोलिसांनी सुरू केला आहे. या गुन्ह्यामध्ये सहभागी सर्व संशयितांची कसून चौकशी करत असल्याचे उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. पाच युवकांसह एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे पुढे येत आहे, तसेच त्यांना प्रवृत्त करत चुकीची प्रेरणा दिल्याच्या संशयावरून संशयित महिलेलाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार