शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपा क्षेत्रात नागरिकांना मास्क अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST

मालेगाव : लॉकडाऊननंतर मिशन बिगीनअंतर्गत नागरिकांसाठी विविध गोष्टी, सोयीसवलती सुरू व खुल्या करण्यात आलेल्या आहेत; परंतु अजूनही कोरोनाचा धोका ...

मालेगाव : लॉकडाऊननंतर मिशन बिगीनअंतर्गत नागरिकांसाठी विविध गोष्टी, सोयीसवलती सुरू व खुल्या करण्यात आलेल्या आहेत; परंतु अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सर्व प्रकारच्या सतर्कता बाळगत आहे. याच धर्तीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाकडून दंडवसुलीची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे, असे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितले.

-------------------------------

कोरोनाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी आजघडीला प्रभावी लस किंवा औषध उपलब्ध नाही. म्हणून सद्य:स्थितीत प्रतिबंध हाच उपचार आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल तर सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझरचा वापर या गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क लावूनच कामानिमित्त बाहेर फिरावे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर आता महानगरपालिका व पोलीस आणि महसूल प्रशासन यांचे संयुक्त पथक दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करणार आहे. यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.