शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह परिसरात माशा, चिलटांचा वाढला प्रादुर्भाव

By admin | Updated: July 24, 2016 23:19 IST

आरोग्य विभाग सुस्त : साथीच्या आजारांनी नाशिककर त्रस्त

नाशिक : पंधरवड्यापासून शहरात विषाणुजन्य आजारांची साथ आणि डासांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला डासांवर नियंत्रण मिळविणे अवघड होत असताना माशांचाही उच्छाद वाढल्याने साथीच्या आजारांचा तेजीने फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या डासांमुळे शहरातील विविध उपनगरांमध्ये डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. एकीकडे बदलत्या वातावरणामुळे पसरणारे विषाणुजन्य आजार, तर दुसरीकडे वाढत्या डासांमुळे होणारे आजार असा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच शहराच्या विविध उपनगरांमध्ये नागरिकांच्या घरांत डासांसह माशाही घोंगावत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. डास व माशांचा वाढता उच्छाद आरोग्यासाठी धोक ादायक असून, पालिकेच्या आरोग्य व हिवताप नियंत्रण विभागाने यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शहरात पसरणारे विषाणुजन्य आजार, डास-माशांचा वाढता उपद्रव आणि सार्वजनिक स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा यामुळे नागरी आरोग्य सध्या संकटात सापडले आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार दुरुस्ती, स्वच्छतेची विविध कामे, घंटागाडी व्यवस्थापन, डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी आदि सर्व उपाययोजनांची आखणी कोलमडून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, मोहाडी तसेच शहरातील वडाळागाव, जुने नाशिक, वडाळारोड, सिडको, उपनगर, डीजीपीनगर, अशोकामार्ग, इंदिरानगर आदि भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव प्रचंड असला तरी माशांच्या उच्छादानेही नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.