शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेरीत आढळले बिबट्याचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:34 IST

दिंडोरीरोडवरील मेरी (तारवालानगर) परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अखेर निष्पन्न झाले असून, वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या जंगलात मेलेले श्वान तसेच जवळच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या भीतीने गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील नागरिक भयभीत आहेत.

नाशिक : दिंडोरीरोडवरील मेरी (तारवालानगर) परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अखेर निष्पन्न झाले असून, वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या जंगलात मेलेले श्वान तसेच जवळच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या भीतीने गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील नागरिक भयभीत आहेत. दोन दिवसांपूर्वी तारवालानगर परिसरात काही नागरिकांनी बिबट्या फिरताना बघितला होता. ज्या चारचाकी चालकाने बिबट्या बघितला त्याने तत्काळ वाहतूक शाखेच्या पोलिसांना माहिती कळविली होती. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळविल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी परिसरात दाखल झाले होते; त्यांनीदेखील पाहणी करून कोणताही पुरावा नसल्याने बिबट्याचा संचार नसल्याचा खुलासा केला होता. बिबट्याचा वावर असल्याने मेरी शाळेला सोमवारी शालेय प्रशासनाने सुटी जाहीर केली होती. मंगळवारी दुपारी परिसरात राहणाºया नागरिकांनी तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनीही पुन्हा परिसरात पाहणी केली असता मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत श्वानावर हल्ला करून ठार केलेले श्वानाचे पिल्लू व बिबट्याचे ठसे आढळून आले.