शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव येथे भरतो मजुरांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:58 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव येथे दररोज सकाळी मजूर मिळविण्यासाठी बाजार भरला जात आहे. जो शेतकरी जादा मजुरी देईल त्यांचाकडे मजूर जाताना दिसत आहे. कामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकºयांची चढाओढ दिसून येते.

ठळक मुद्देचढाओढ : जास्त मजुरी देणाऱ्या शेतकºयांना पसंती

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव येथे दररोज सकाळी मजूर मिळविण्यासाठी बाजार भरला जात आहे. जो शेतकरी जादा मजुरी देईल त्यांचाकडे मजूर जाताना दिसत आहे. कामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकºयांची चढाओढ दिसून येते.ठाणगाव परिसरातून दररोज १० ते १२ ट्रक भाजीपाला भरून मुंबईला जात आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. तुटपुंज्या पावसावर शेतकºयांनी आपल्या शेतात वटाणा, वालपापडी, घेवडा, कोबी, टमाटे आदी पिके घेतली. कमी पाऊस असला तरीही म्हाळुंगी नदीच्या पाण्यावर पिकेही जोमात उभी राहिली आहे. काढणीसाठी आलेली पिके तोडण्यासाठी मजुरांची गरज असल्याने ठाणगाव येथे दररोज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, वासाळी, तर इगतपुरी तालुक्यातील टाकेद, धामणगाव, घोटी आणि पेठ भागातील कोकणी लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या भागात येतात दररोज सकाळी ग्रामपंचायत परिसरात ट्रक, पिकअप व मिळेल त्या साधनाने मजूर येथे येतात. सकाळी ९ ते ४ यावेळेत शेतात काम करतात. शेतकरी मजूर मिळविण्यासाठी दुपारी तासभर सुट्टीही देतात. आपल्या शेतातील काढलेला शेतमाल लवकर विक्रीसाठी आणला तर बाहेरून आलेले व्यापारी जादा भाव देतात. शेतकºयांच्या मालाला भावमिळो अथवा ना मिळो परंतु शेतमजुराला ठरलेला ३०० रुपये रोज द्यावा लागतो.मजुरीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार ग्रामपंचायत परिसरात सकाळी ६ वाजेपासूनच मजूर येत असल्याने शेतकºयांना मजूर मिळविण्यासाठी जावे लागते. मजुराची संख्याही अधिक असल्याने ठाणगावसह परिसरातील पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे तर नगर जिल्ह्यातील समशेरपूर, टहाकरी, अकोले या भागातील शेतकरी आपल्या गाड्या घेऊन शेतमजूर घेण्यासाठी येत असतात. मजुरांना सुरुवातीला २०० रुपये रोज देण्यात येत होता. आता वटाणा पिकाला समाधानकारक भाव असल्याने शेतकरीही मजुरांना दोन पैसे जास्त देण्यासाठी तयार आहे. ३०० रुपये रोजंदारी देण्यासाठी विरोध दर्शविल्यानंतर मजुरांनी जो शेतकरी जादा रोज देईल, त्यांच्याकडे जाताना दिसत आहे. याबाबत ठाणगावकर लवकरच बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास भोर यांनी दिली.